जगप्रसिद्ध बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे - चाळीसगावी भारतीय बौद्ध महासभेची मागणी - Ideal India News

Post Top Ad

जगप्रसिद्ध बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे - चाळीसगावी भारतीय बौद्ध महासभेची मागणी

Share This
#IIN 

जगप्रसिद्ध बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे - चाळीसगावी भारतीय बौद्ध महासभेची मागणी


सूर्य कान्त कदम
चाळीसगाव प्रतिनिधी - बुद्धगया येथील जगप्रसिद्ध बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातील बौध्द बांधवांच्या वतीने भारतीय बौध्द महासभेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे प्रचारक तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल, कुलीन पुत्र भिक्खू वेस्सभुजी औरंगाबाद,
भिक्खू संघरत्न (अध्यक्ष - युनायटेड बुद्धिष्ट महासंघ ) यांच्या उपस्थितीत दि 9 जुलै 2021 रोजी दुपारी 1 वाजता चाळीसगाव येथे करण्यात आली तशा आशयाचे निवेदन पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले.
       निवेदनात म्हटले आहे की भारतातील प्रत्येक धर्माचे पवित्र स्थळ हे त्या त्या धर्माच्या नियंत्रणाखाली आहे परंतु बुद्धगया येथील जगप्रसिद्ध बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात नाही त्यावर बौद्धांचे नियंत्रण होवू नये अशी तरतूद त्यासंदर्भातील कायद्यात केली आहे हे अन्यायकारक व गैरकायदेशीर असून बौद्धांच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली करणारे आहे.
सदर पवित्र व महान बुद्धगया विहार (मंदीर) बौद्धांच्या ताब्यात देण्यात याचे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे प्रचारक तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल , बौद्धाचार्य भैय्यासाहेब ब्राम्हणे धम्म उपासिका सोनालिताई लोखंडे आदी समाज बांधवांनी बौध्द धम्माचा इतिहास व बुद्धगया विहार बाबत सखोल माहिती दिली.
प्रसंगी पुज्य भिक्खु संघरत्न औरंगाबाद, भैय्यासाहेब ब्राह्मणे, संघमित्रा चव्हाण, गौतमभाऊ जाधव, नगरसेवक रामचंद्र जाधव, चंद्रमनी पगारे, रवींद्र निकम, स्वप्नील जाधव, तुषार मोरे, भाईदास गोलाईत,मुकेश नेतकर, भैय्यासाहेब जाधव, सागर निकम, भागवत बागुल, आकाश देशमुख, वाल्मिक जाधव,  पितांबर झाल्टे, महेश चव्हाण, विशाल आहिरे, सोनू जाधव, भीमराव मोरे, विनोद खैरे, अनिल झाल्टे, राजरत्न मोरे, आकाश जवरे, आबासाहेब गरुड, गिरीश खापर्डे, संजय जाधव, आनंद बागुल, वैशाली अहिरे, भैय्यासाहेब जाधव, संपत करडक, बबलू जाधव, प्रेमदास जाधव, प्रकाश सोनवणे, मनोज जाधव, महेंद्र जाधव, देविदास जाधव, शिवाजी जाधव, पंढरीनाथ जाधव, विशाल पगारे, बाबा पगारे, सुरेश पगारे, सुनील निकम, गौतम आराक, किशोर जाधव आदी  बौद्ध बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad