दवाखान्यातून फरार असलेला आरोपी चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात - Ideal India News

Post Top Ad

दवाखान्यातून फरार असलेला आरोपी चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात

Share This
#IIN


सूर्यकांत कदम
दवाखान्यातून फरार असलेला आरोपी चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात
चाळीसगाव - जळगाव येथील गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना फरार झालेल्या आरोपी स चाळीसगाव डी बी च्या भूषण पाटील, सतिष राजपूत या दोघा कर्मचाऱ्यांनी दि 29 रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास अटक केली आहे.
           आरोपी शंकर रविंद्र चौधरी 24 रा शिव कॉलनी चाळीसगाव हा नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात जळगाव मध्यवर्ती कारागृहात न्यायायलीन कोठडीत असतांना त्याची प्रकृती खराब झाल्याने त्यास गोदावरी फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते दि 26 जून रोजी दुपारी 2-30 वाजेच्या सुमारास हॉस्पिटल च्या चौथ्या माळ्यावरून खिडकीची जाळी तोडून फरार झाला होता तेव्हा पासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
हा आरोपी चाळीसगावी असल्याची गोपनीय माहिती डी बी चे पो कॉ भूषण पाटील, सतिष राजपूत यांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दि 29 जून रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास चालीसगाव महाविद्यालयाजवळील वाय पॉइंट जवळ सापळा रचून आरोपी शंकर चौधरी यास अटक केली आहे. सदर घटनेत ए एस आय अनिल अहिरे, पो कॉ शैलेश पाटील, विजय पाटील, दीपक पाटील, शरद पाटील यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad