*मीरा क्लीन फुएल्स लिमीटेड (MCL),मुंबई अंतर्गत अनुविरा प्रोड्युसर कंपनी लिमीटेड कंपनीच्या जैविक इंधन व सेंद्रिय शेती प्रकल्पाचे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भूमीपूजन - Ideal India News

Post Top Ad

*मीरा क्लीन फुएल्स लिमीटेड (MCL),मुंबई अंतर्गत अनुविरा प्रोड्युसर कंपनी लिमीटेड कंपनीच्या जैविक इंधन व सेंद्रिय शेती प्रकल्पाचे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भूमीपूजन

Share This
#IIN

प्रा अमिता कदम 
*मीरा क्लीन फुएल्स लिमीटेड (MCL),मुंबई अंतर्गत अनुविरा प्रोड्युसर कंपनी  लिमीटेड    कंपनीच्या जैविक  इंधन व सेंद्रिय शेती प्रकल्पाचे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भूमीपूजन*
 बारामती (पुणे)     MCL कंपनीने  भारतातील 5500 तालुक्यात सदर प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठरवले असून सदर कंपनीच्या पहिल्या १०० तालुक्यात येण्याचा मान अनुविरा प्रोड्युसर कंपनी लिमीटेड, बारामती कंपनीने  पटकावला आहे. या कंपनीच्या जैविक इंधन व सेंद्रिय शेती प्रकल्पाचे भूमीपूजन अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. 
या प्रकल्पामध्ये  नेपियर (हत्ती ) गवत  यापासून जैविक इंधन तसेच सेंद्रीय खत निर्मिती केली जाणार आहे.सदरचा प्रकल्प हा शेतकरी उत्पादक कंपनी च्या  माध्यमातून चालणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला  शाश्वत  उत्त्पन्न मिळण्यास   मदत होणार आहे. ग्राम पातळीवर उद्योजक नेमणूक करून ग्रामीण भागात रोजगार वाढीस मदत होणार आहे. भूमिहीन शेतकऱ्यांना देखील विविध योजनांद्वारे रोजगार आणि उत्पन्नाचा मार्ग कंपनी मार्फत देण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी सभासद नोंदणी चालू झालेली  आहे.  बारामती तालुक्यातील शेतकरी, बेरोजगार तसेच भूमिहीन व्यक्तींनी अनुविरा प्रोड्युसर कंपनी लिमीटेड कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून आपल्या आणि आपल्या तालुक्याच्या  विकासासाठी हातभार लावण्याचे आवाहन  अनुविरा प्रोड्युसर कंपनी लिमीटेड, कंपनी मार्फत करण्यात येत  आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad